हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी `या` टिप्स फॉलो करा

October 9, 2024by Dr. Shridevi Lakhe

   प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे ,हिवाळा या ऋतूमध्ये सुद्धा त्वचेची काळजी घेतली पाहिजे कारण हिवाळा या ऋतूमध्ये थंडी , कमी आर्द्रता तसेच कोरडी हवा यामुळे त्वचा कोरडी पडते.म्हणूनच हिवाळ्यात त्वचेला विशेष काळजी घेणे आवश्यक असते.जर तुम्हाला सुद्धा तुमची त्वचा कोरडी होण्यापासून सुरक्षित करायचे असेल तसेच त्याचे व्यवस्थित रित्या काळजी घ्यायची असेल तर पुढील टिप्स नक्की फॉलो करा.

हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स (Tips for Skin Care in Winter:):

1. हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे :

आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे परंतु बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये थंडी असल्याने आपल्याकडून पाणी कमी प्रमाणामध्ये दिले जाते आणि त्यामुळे पाण्याची कमतरता भासते आणि त्वचा कोरडी पडते. म्हणूनच दिवसभरामध्ये कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे त्यासोबतच ग्रीन टी किंवा हर्बल टी आवडत असल्यास त्याचे सुद्धा सेवन करू शकतात.

2. नियमित मॉइश्चरायझर वापरावे : 

– कोरड्या त्वचेपासून संरक्षण होण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझर लावणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच नियमितपणे मॉइश्चरायझरचा वापर करावा.
– मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे मॉइश्चरायझर उपलब्ध आहे आपल्या त्वचेला सूट होतील त्याप्रमाणे योग्य मॉइश्चरायझरची निवड करून नियमितपणे वापर करावा.

3. जास्त गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने स्नान करा :

हिवाळ्यामध्ये थंडी असल्याकारणाने अनेक जण गरम पाण्याने स्नान करतात परंतु जास्त गरम पाणी त्वचेची नैसर्गिक आर्द्रता काढून टाकते आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडते म्हणूनच अंघोळ करण्याकरिता गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा आणि आंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझर नक्की लावा.

4. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा :

हिवाळ्यात सूर्यप्रकाश जास्त तीव्र नसतो परंतु तरीसुद्धा युवी किरणांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते म्हणूनच हिवाळ्यामध्ये सुद्धा एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा अधिक असा सनस्क्रीन लावा खास करून चेहरा आणि हातांना, कारण चेहरा आणि हात झाकलेले नसतात त्यामुळे यू वी किरणांचा थेट संपर्क त्यांच्याशी येतो.

5. चांगला आहार घ्या :

जास्त फॅट्स असणारे पदार्थ किंवा शिळ्या फळभाज्या किंवा पालेभाज्या खाल्ल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते त्यामुळे आहारामध्ये योग्य प्रमाणात विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट असणे आवश्यक आहे, त्वचेसाठी ते फायदेशीर सुद्धा आहे म्हणूनच आहारामध्ये ताजे फळे आणि भाज्या, विटामिन युक्त अन्नपदार्थांचा समावेश करावा.

6. ओलावा टिकवून ठेवणारी उत्पादने वापरावी :

हिवाळ्यामध्ये कमी आर्द्रता असल्यामुळे कोरडी हवा जाणवते आणि त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी पडते आणि म्हणूनच जर हिवाळ्यामध्ये ह्युमिडिफायरचा उपयोग केला तर घरामध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्वचा कोरडी होण्यापासून सुरक्षित राहते.

7.  ओठ आणि हातांची काळजी घ्या :

हिवाळ्यामध्ये ओठांची आणि हातांची काळजी घेणे गरजेचे असते कारण हिवाळ्यामध्ये ओठ उलणे, हातपाय उलणे,ओठ आणि हात पायांची त्वचा कोरडी झाल्यामुळे त्वचेला तडे जाऊ शकतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये नियमितपणे बॉडी लोशन, लीप बाम आणि हॅन्ड क्रीम वापरू शकता.

8. नियमित एक्सफोलिएशन करा :

– हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे त्वचेमध्ये मृत पेशी असतात तसेच त्वचा खडबडीत दिसते यासाठी आठवड्या मधून एक ते दोन वेळा सौम्य एक्सफोलिएटरचा उपयोग करून त्वचा व्यवस्थित स्वच्छ करू शकता यामुळे त्वचेमधील मृतपेशी निघून जातात आणि त्वचा तजेलदार दिसते.

9. कॉटनचे आणि नैसर्गिक फायबरचे कपडे घाला :

हिवाळ्यामध्ये सिंथेटिक कपडे घालणे टाळावे त्यामुळे त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचेला खाज येणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात त्यामुळे कापसापासून किंवा लोकरी पासून बनवलेले कपडे तसेच नैसर्गिक फायबर पासून बनवलेले कपडे यांचा उपयोग करू शकतो.

10. झोपण्याआधी चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घ्या :

बऱ्याचदा दिवसभरामध्ये चेहऱ्यावर मेकअप लावलेला असतो आणि तो जर रात्री झोपण्यापूर्वी काढला नाही तर त्याचे वाईट परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात म्हणूनच चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकावा, त्यानंतर चेहरा स्वच्छ करून हायड्रेटींग नाईट क्रीम किंवा सिरम लावू शकता किंवा त्वचा मॉइश्चराईज करू शकता.

हिवाळ्यामध्ये तसेच इतर ऋतूमध्ये सुद्धा त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच वरील प्रमाणे काही टिप्स वापरल्यामुळे हिवाळ्यामध्ये त्वचेची व्यवस्थित रित्या काळजी घेतली जाते. पाण्याचे योग्य सेवन, त्वचा मॉइश्चराईस ठेवणे, योग्य आहार घेणे, स्नानासाठी कोमट पाणी वापरणे यांसारख्या सवयी नियमितपणे अवलंबल्यास हिवाळ्यातही त्वचा सुंदर, मुलायम आणि निरोगी राहील.

By following these tips, you can ensure your skin stays healthy and soft throughout winter. It’s always a good idea to consult a skin specialist in Kharadi for personalized skin care advice. Dr. Shridevi Lakhe at MediSkin Clinic is a well-known skin specialist who can guide you in maintaining healthy skin in every season.

https://mediskinhairclinic.com/wp-content/uploads/2023/02/Medi-Skin-Hair-Clinic-100h.png
Follow US
86000 09731
mediskinhairclinic01@gmail.com
Address

Medi Skin Hair Clinic | Dermatologist in Kharadi | Hair Transplant Surgeon in Kharadi

Find US

Copyright © 2024 | Mediskin & Hair Clinic| All Rights Reserved