तेलकट त्वचेसाठी स्किन केअर रुटीन : घरी त्याची काळजी कशी घ्यावी ?

December 9, 2024by Dr. Shridevi Lakhe

तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना सतत त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तेलकट त्वचेमुळे मुरूम तसेच ब्लॅकहेड सारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून तेलकट त्वचेसाठी योग्य ते स्किन केअर रुटीन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रभावी असे स्किन केअर रुटीन कसे असावे याबद्दल माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

तेलकट त्वचेसाठी स्किन केअर रुटीन : घरी त्याची काळजी कशी घ्यावी ?

१. चेहरा स्वच्छ करण्यासाठी योग्य त्या फेस वॉशचा उपयोग करा :

तेलकट त्वचेची देखभाल करण्यासाठी चेहरा स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चेहरा स्वच्छ करण्यासाठी सौम्य आणि आपल्या त्वचेला योग्य असा फेस वॉश वापरणे आवश्यक आहे. फेस वॉशच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने साफ होते आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाते. चेहऱ्यावरील तेल आणि घाण साफ करणे हे खूप आवश्यक आहे दिवसभरामधून कमीत कमी दोन वेळा फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवावा. फेस वॉशने चेहरा दोन ते तीन वेळापेक्षा जास्त वेळा धुवू नये कारण असे केल्यामुळे त्वचा अजून ड्राय होण्याची शक्यता असते.

२. चेहऱ्यावरील त्वचा योग्य पद्धतीने स्क्रब करा :

चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स निघून जाण्यासाठी योग्य पद्धतीने स्क्रब करणे आवश्यक आहे. जर तेलकट त्वचेवर डेड स्किन सेल्स जमा झाले तर यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स निर्माण होतात तसेच मुरूम दिसू लागतात. चेहऱ्याला स्क्रबिंग केल्यामुळे ही मृत त्वचा निघून जाते आणि तेलाची चेहऱ्यावरील पातळी सुद्धा कमी होते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही स्क्रब करू शकतात. स्क्रबची निवड करताना त्यामध्ये छोटे आणि सौम्य कण आहेत याची खात्री करावी जर जास्त मोठे कण असणारे स्क्रब असेल तर त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. तुमच्या त्वचेला सूट होतील असेच स्क्रब मार्केट मधून खरेदी करू शकता किंवा अगदी घरच्या घरी मध आणि साखरेचा उपयोग करून स्क्रब करू शकता.

३. चेहऱ्यावर टोनर वापरा :

टोनरचा त्वचेवर उपयोग केल्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल तसेच डेड स्किन सेल्स आणि अशुद्धता कमी होण्यामध्ये मदत होते. तेलकट त्वचेसाठी सौम्य आणि नैसर्गिक टोनर वापरणे चांगले म्हणून अगदी घरी उपलब्ध असलेली काकडी तसेच गुलाबाचे पाणी यांचा उपयोग करू शकता. गुलाबाचे पाणी तसेच काकडीच्या वापरामुळे त्वचा ताजीतवांनी राहण्यासाठी मदत होते तसेच त्वचेवरील पोर्स बंद करण्यास सुद्धा मदत होते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की टोनर वापरण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे आहेत.

४. हायड्रेशन आणि मॉइश्चरायझिंग :

तेलकट त्वचेसाठी सुद्धा मॉइश्चरायझर वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेलकट असलेल्या त्वचेला सुद्धा हायड्रेशनची आवश्यकता असते आणि त्यामुळे हायड्रेटींग असे मॉइश्चरायझर तेलकट त्वचेसाठी वापरणे आवश्यक आहे. तेलकट त्वचा असलेले व्यक्ती ज्या मोईश्चरायझरचा उपयोग करतात ते मॉइश्चरायझर तेलमुक्त आणि हलके असावे ज्यामुळे त्वचेवर अधिक तेल जमा होणार नाही. शक्यतो तेलकट त्वचेसाठी जेल आधारित मॉइश्चरायझर वापरणे उत्तम ठरते.

५. सूर्यापासून संरक्षण करावे :

सूर्याच्या यु व्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी दररोज एक लाईट सनस्क्रीन वापरावे. चेहऱ्यावर सनस्क्रीन वापरल्यामुळे त्वचेचे संरक्षण होते तसेच ब्लॅकहेड्स आणि मुरूम येण्यापासून त्वचेचा बचाव होतो. सनस्क्रीन वापरण्यापूर्वी सनस्क्रीनचा प्रकार आणि त्याचे प्रमाण त्वचेसाठी योग्य आहे का हे तपासणे महत्वाचे आहेत.

 

Read More Blogs – हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी `या` टिप्स फॉलो करा

 

६. फेस पॅकचा उपयोग करा :

नैसर्गिक असे फेस पॅक तेलकट त्वचेसाठी खूप प्रभावी आहेत यामुळे त्वचा सॉफ्ट आणि हायड्रेटेड राहते. तेलकट त्वचेसाठी काही लोकप्रिय असे फेसपॅक पुढीलप्रमाणे आहेत :

1. मुलतानी मातीचा फेस पॅक : मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार गुलाब पाणी मिसळून त्याचा फेस पॅक तयार करून घ्या आणि हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटांसाठी तसाच राहू द्या, नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून निघते.

2. दही आणि मध यांचा फेस पॅक : थोडेसे दही आणि मध मिसळून हे चेहऱ्यावर व्यवस्थित रित्या लावावे, दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्यावे आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. दह्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते तर मध त्वचेला सौम्य बनवतो.
अशा प्रकारचे फेस पॅक आठवड्या मधून एक किंवा दोन वेळा वापरणे फायदेशीर ठरू शकते.

७. शरीरासाठी आवश्यक ते पाणी प्या :

आपले शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी दिवसामधून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिले पाहिजे. पाणी हे शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करते तर यामुळे त्वचा सुद्धा हायड्रेटेड राहते.

८. संतुलित आहार घ्यावा :

आपल्या शरीरासाठी तसेच त्वचेसाठी संतुलित आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिक तेलकट किंवा तळलेले पदार्थ तसेच प्रक्रिया केलेले अन्न, अधिक गोड पदार्थ खाणे हे टाळले पाहिजे. पालेभाज्या, फळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा.

९. उत्पादने खरेदी करताना घ्यावयाची काळजी :

चेहऱ्यासाठी कुठलेही उत्पादन खरेदी करताना ते उत्पादन कोणत्या त्वचेसाठी आहे तसेच हे उत्पादन आपल्या त्वचेला सूट होईल की नाही याची खात्री करूनच ती उत्पादने खरेदी करावी.

तेलकट त्वचेसाठी स्किन केअर रूटीन अगदी सोप्या शब्दात :

– चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा.
– त्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावू शकता.
– काही मिनिटांनी चेहऱ्याला योग्य ते मॉइश्चरायझर लावा.
– दिवस असेल तर सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशन वापरा.

अशा रीतीने तेलकट त्वचेसाठी स्किन केअर रुटीन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी घरून सुद्धा साध्या आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करून तुमची त्वचा ताजेतवानी आणि निरोगी राहू शकते यासाठी स्किन केअर रुटीनमध्ये नियमितता ठेवणे आणि संयम असणे आवश्यक आहे. अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेले स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरून सुद्धा तुम्ही तुमची त्वचा चांगली ठेवू शकता. अशा पद्धतीने त्वचेसाठी स्किन केअर रुटीन हे दररोज नियमितपणे केले पाहिजे यामुळे त्वचेचे आरोग्य नक्कीच चांगले राहील.

आपल्या तेलकट त्वचेसाठी योग्य स्किन केअर रुटीन बनवणे हे महत्त्वाचे आहे, आणि त्यामध्ये नियमितता ठेवणे फार आवश्यक आहे. तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी व समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी, Dr. Shridevi Lakh , Skin specialist in Kharadi at MediSkin Clinic येथे भेट देऊन तुमच्या त्वचेच्या समस्या आणि उपचारांबाबत सल्ला घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही तेलकट त्वचेची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. त्वचेसाठी योग्य सल्ला आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा!

 

 

https://mediskinhairclinic.com/wp-content/uploads/2023/02/Medi-Skin-Hair-Clinic-100h.png
Follow US
86000 09731
mediskinhairclinic01@gmail.com
Address

Medi Skin Hair Clinic | Dermatologist in Kharadi | Hair Transplant Surgeon in Kharadi

Find US

Copyright © 2024 | Mediskin & Hair Clinic| All Rights Reserved