धूळ आणि प्रदूषणाने होणाऱ्या त्वचा रोगांचे कारण आणि उपाय

December 11, 2023by Dr. Shridevi Lakhe

नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की, वाढत्या लोकसंख्येमुळे आणि सतत च्या झाडांच्या कत्तली मुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धूळ आणि प्रदुषण वाढत जात आहे आणि याचा सर्वात जास्त परिणाम मानवाच्या त्वचेवर होत आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला धूळ आणि प्रदूषणाने होणार्या त्वचा रोगांचे कारण आणि उपाय या article च्या माध्यमातून सांगणार आहोत की, धूळ आणि प्रदूषणाने त्वचेचे कोण कोणते रोग होतात?, त्याची कारणे काय आहेत? आणि त्यासोबत त्या रोगांवर उपाय काय करावे? करिता प्रस्तुत article तुम्ही सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा. आमच्या या article मुळे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल अशी आशा बाळगतो.

धूळ आणि प्रदूषणाने होणारे त्वचेचे रोग- Skin diseases caused by dust and pollution

धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेशी संबधित अनेक प्रकारचे रोग होण्याची दाट शक्यता असते. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, खरच! धूळ एवढी हानिकारक असू शकते का? तर “होय” धूळ खूप हानिकारक असते कारण की, धूळ मध्ये परिसरातील घाण आणि मृत त्वचेच्या पेशी असतात त्यामुळे धूळ ही मानवाच्या त्वचेला खूप घातक ठरत असते कारण मानवाची त्वचा ही फार संवेदनशील असते.

धूळ आणि प्रदूषणामुळे मानवाच्या त्वचेला खाज सुटणे, पुरळ येणे, त्वचेला भेगा पडणे, त्वचेला लालसर डाग पडणे, त्वचा कोरडी पडणे अशी कित्येक प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. 

     धूळ आणि प्रदूषणामुळे आणखी काही रोग होतात ते आपण खालील प्रमाणे पाहूया.

  • ऍलर्जी
  • एक्जिमा
  • कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस  

आता आपण धूळ आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या या सर्व रोगांची कारणे काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया….

धूळ आणि प्रदूषणाने होणाऱ्या त्वचा रोगांची कारणे – Reasons of Skin diseases caused by dust and pollution

 धूळ आणि प्रदूषणाने होणाऱ्या त्वचा रोगांची काही संभाव्य कारणे असतात ते आपण एक एक करून पाहूया.

  • त्वचेला खाज सुटणे 

धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेचा खाज सुटत असते त्याचं कारण असं आहे की, पावसाळ्याच्या ऋतू मध्ये कित्येकदा आपण पाणी उकळून न पिता तसेच पित असतो जे दूषित राहतं आणि या दूषित पाण्यामुळे आपल्या त्वचेला खाज सुटत असते. या व्यतिरिक्त ही आपल्याला थोडं काही झालं की आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकल मधून स्वतःच्याच मर्जीने कोणतंही औषध घेतो त्यामुळे त्या औषधांचा reaction आपल्या त्वचेवर होत असते आणि त्यामुळे देखील आपल्या त्वचेला खाज सुटत असते.

  • त्वचेवर पुरळ येणे

वयात आलेल्या मुलांमध्ये मुरूम, पुरळ येणे सामान्य आहेत परंतु विशेषतः त्वचेवर पुरळ उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश मुळे येत असतात आणि धुळीमध्ये असणारे विषाणू, जिवाणू तसेच परजिवीमुळे आपल्या त्वचेवर पुरळ येत असते.

  • त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचेला भेगा पडणे.

विशेषतः हिवाळ्यात आपल्याला अशी लक्षणे बघायला मिळतात परंतु त्याशिवाय आपण त्वचेला वेग वेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स लावत असतो आणि त्यामधील केमिकल्स मुळे आपल्या त्वचेवरील ओलावा कमी होत जातो त्यामुळे देखील आपली त्वचा कोरडी किंवा त्वचेला भेगा पडत असतात.

  • त्वचेवर लालसर डाग येणे

धुळ आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवर खाज येत असते आणि सारखं सारखं आपण त्या एकाच ठिकाणी खाजवत राहिलो की त्यावर काही दिवसाने लालसर चट्टे येतात. याशिवाय वेग वेगळे रसायनयुक्त ब्युटी प्रॉडक्ट चा अती वापर केल्याने देखील आपली त्वचा लालसर पडत असते.

  • ऍलर्जी

वाढत्या धूळ आणि प्रदूषणामुळे नेहमी नेहमी त्वचेचे रोग होत असल्याने काही दिवसाने त्याचे रूपांतर ऍलर्जी मध्ये होत असते कारण धूळ मध्ये फक्त घाण आणि मृत पेशी एवढेच नसून घरी किंवा घराजवळ जनावरे असल्यास त्यांच्या धूळ, परागकण, धुळीचे साचे यामुळे देखील ऍलर्जी होत असते. 

  • एक्जिमा

ज्यांना अन्नाची आणि धुळाची ऍलर्जी असते त्यांना एक्जिमा होण्याची दाट शक्यता असते. कारण काही ऍलर्जी मुळेच एक्जिमा होत असतो. अशी लोकं ज्यांना एक्जिमा होण्याची शक्यता असते असे लोकं धुळीच्या संपर्कात आले की त्यांचा एक्जिमा ट्रिगर होतो.

  • कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस   

कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस या रोगाचा नाव तुम्ही क्वचितच ऐकले असणार परंतु हा सुद्धा धूळ आणि प्रदूषणामुळे होत असतो. हा ऍलर्जी मुळेच होणारा रोग आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टीची ऍलर्जी आहे त्या गोष्टीला स्पर्श केल्या की तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस होऊ शकतो. या रोग एवढा गंभीर तर नाही पण याला पर्यावरणीय साथ मिळाला तर हा रोग गंभीर होऊ शकतो.

धुळ आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या त्वचेच्या रोगांसाठी उपाय – remedies for skin diseases caused by dust and pollution

           वरील माहिती मध्ये आपण धूळ आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या त्वचेच्या रोगांची कारणे तर बघितली परंतु आता आपल्याला बघायचं आहे की त्यावर उपाय काय करायचे ज्यामुळे ते त्वचेचे रोग आपल्याला जळणार नाही किंवा नाहीसे होतील. ते आपण खालील प्रमाणे पाहूया.

  • त्वचेला खाज सुटल्यास काय करावे?

त्वचेला खाज सुटण्याचं सर्वात मोठ्ठ कारण म्हणजे दूषित पाणी आहे त्यामुळे अंघोळ करतांनी आपल्या अंघोळीचं पाणी स्वच्छ आहे की नाही हे बघावं आणि त्यात 2 ते 3 चमचे लिंबुचा रस आणि 1 चमचा बेकिंग सोडा अंघोळीच्या पाण्यात टाका त्यामुळे तुमच्या त्वचेला खाज सुटणार नाही. National Centre by Biotechnology Information ने असं सांगितलं आहे की, बेकिंग सोडा आणि लिंबू मध्ये त्वचा मऊ होण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे हा उपाय त्वचेच्या खाजेसाठी रामबाण उपाय आहे. 

  • त्वचेवर पुरळ आल्यास काय करावे?

त्वचेवर पुरळ येणे तर सामान्य आहे आणि हे पुरळ कुठल्याही प्रकारचे उपाय न करता बरे होतात परंतु जर पुरळ हे पाच वर्षाखालील मुलांना झालं असेल तर याकडे मात्र दुर्लक्षित करू नका. त्यासाठी पुरळ वर बर्फ लावा, गरम पाण्याचा वापर टाळा, शक्यतो ते पुरळ असलेले ठिकाण उघडे ठेवा असं केल्यास लहान मुलांचे पुरळ लवकर बरे होण्यास मदत होते परंतु जर बरे झाले नाही तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी निर्देशित केलेले औषोधोचार करा.

  • त्वचा कोरडी पडल्यास काय करावे? 

त्वचा कोरडी पडण्याचे सर्वात मोठे कारण असे आहे की आपण रसायनयुक्त ब्युटी प्रॉडक्ट्स चा खूप वापर करीत असतो त्यामुळे आपल्या त्वचेवरील ओलावा कमी होत जातो म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय भरपूर पाणी प्या, आयुर्वेदीय ब्युटी प्रॉडक्ट्स बाजारात खूप असतात त्यांचा वापर करा आणि त्यापेक्षा सहज सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे घरी तुमच्या अलोव्हेरा चे झाड असेल किंवा तुमच्या घरा शेजारी असेल तर त्यांचा वापर करा त्यामुळे तुमच्या त्वचेवरील ओलावा कायम राहील आणि त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही.

  • त्वचेवर लालसर डाग आल्यास काय करावे?

त्वचेवर लालसर डाग किंवा चट्टे आल्यास थंड पाण्याने अंघोळ करा. मेडिकल मध्ये झिंक ऑक्साईड असलेले लोशन मिळते त्याचा वापर करा. त्यामुळे त्वचेवर लालसर डाग किंवा चट्टे आल्यास फायदा मिळतो आणि जर तुमच्या त्वचेवर उन्हामुळे लालसर चट्टे किंवा डाग आले असतील तर अँटीहिस्ट्यामाइन्स नामक औषधींचा वापर करा त्याने त्या लालसर चट्यांवरील खाज कमी करीत असते. 

  • धुळ आणि प्रदूषणाने ऍलर्जी झाल्यास काय करावे?

वाढत्या धूळ आणि प्रदूषणामुळे कित्येक लोकं ऍलर्जी चे बळी होत आहेत त्यावर उपाय म्हणून तुम्ही गरम दुधात एक चम्मच हळद आणि मध टाकून पिले तर ऍलर्जी कमी होत असते, पुदिनाची पाने आणि मध टाकून चहा पिल्यास सुद्धा ऍलर्जी कमी होते असते किंवा नुसतं मध झाल्यास सुद्धा ऍलर्जी कमी होत असते, Green Tea सुद्धा ऍलर्जी साठी लाभदायक आहे याशिवाय तुम्ही गायीच्या तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्यास देखील ऍलर्जी चे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हे उपाय घरी करू शकता. 

  • धूळ आणि प्रदूषणाने एक्जिमा झाल्यास काय करावे?

धुळ आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या या एक्जिमा ला दूर करण्यासाठी नारळाच्या तेलात कापूर टाकून तो तेल तुम्ही ज्या ठिकाणी एक्जिमा झाला असेल त्या ठिकाणी लावला तर एक्जिमा बरा होतो, एक्जिमा ज्या ठिकाणी झाला असेल त्या ठिकाणी शहद लावा आणि अर्ध्या तासाने थंड पाण्याने त्याला धुवून टाका त्यामुळे देखील एक्जिमा बरा होत असतो याशिवाय एलोवेरा चापेस्ट बनवून तुम्ही त्या ठिकाणी लावल्यास एक्जिमा बरा होतो.

  • कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस झाल्यास काय करावे? 

हा एक प्रकारचा त्वचा रोग च आहे जो आपल्याला ज्या गोष्टीची ऍलर्जी आहे त्या गोष्टीचा संपर्कात आल्यास होतो त्यामुळे तुम्हाला माहिती असेल तर अशा गोष्टींपासून दूर रहा आणि आपल्या परिसरात स्वच्छता ठेवा कारण जास्तीत जास्त त्वचा रोग हे स्वच्छता न ठेवल्यामुळेच होत असतात.

निष्कर्ष

तर मित्रांनो आम्ही तुम्हाला धूळ आणि प्रदूषणाने होणार्या त्वचा रोगांचे कारण आणि उपाय या Article च्या माध्यमातून धूळ आणि प्रदुषण मुळे होणारे अनेक त्वचा रोग सांगितलेले आहेत त्यांची कारणे सांगितलेली आहेत आणि सोबतच या त्वचा रोगांवर उपाय काय करावे ते देखील सांगितले आहेत. प्रस्तुत article मधील ही माहिती वाचून तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला comment box मध्ये नक्कीच कळवा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना share करायला विसरू नका.

तुम्हाला तुमच्या आणखी काही आरोग्याविषयी समस्या असतील तर तुम्ही आमच्या Mediskin Hair Clinic, Pune इथे नक्कीच एकदा भेट देऊन बघा. आम्ही तुम्हाला इष्टतम दरात उत्तोमत्तम आरोग्यसेवा देऊ. अधिक माहिती साठी आमच्या हॉस्पिटल च्या https://mediskinhairclinic.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://mediskinhairclinic.com/wp-content/uploads/2023/02/Medi-Skin-Hair-Clinic-100h.png
Follow US
86000 09731
mediskinhairclinic01@gmail.com
Address

Medi Skin Hair Clinic | Dermatologist in Kharadi | Hair Transplant Surgeon in Kharadi

Find US

Copyright © 2024 | Mediskin & Hair Clinic| All Rights Reserved