दूषित वातावरणामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे तसेच पोषक आहार न घेतल्यामुळे किंवा यासारख्या इतर काही कारणांमुळे चेहऱ्यावर मुरूम व पुळ्या होण्याचे प्रमाण वाढत आहे. चेहऱ्यावर पिंपल्स, व्हाइट हेड्स किंवा ब्लॅकहेड्स यांचा त्रास बऱ्याच लोकांना होतो. आजच्या ब्लॉगमध्ये चेहऱ्यावरील मुरूम व पूळ्या जाण्यासाठी काय उपाय करावेत हे आपण बघणार आहोत.
चेहऱ्यावरील मुरूम व पूळ्या जाण्यासाठी उपाय – Remedies to get rid of blackheads and pimples on the face :
चेहऱ्यावरील मुरूम व पूळ्या जाण्यासाठी विविध उपाय उपलब्ध आहेत त्यापैकी काही उपाय पुढील प्रमाणे आहेत :
१. चेहरा स्वच्छ ठेवावा –
– आपल्या चेहऱ्याला जास्त वेळा हात लावणे टाळावे कारण आपल्या हातामध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरिया तसेच धूळ असू शकते. जर आपण आपल्या चेहऱ्याला वारंवार हात लावला तर नक्कीच याचा परिणाम चेहऱ्यावर होऊ शकतो आणि मुरूम आणि पुळ्या चेहऱ्यावर वाढू शकतात.
– चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या त्वचेला योग्य असा फेस वॉश वापरावा. चेहरा धुवत असताना जास्त प्रमाणात चेहरा घासू नये.
२. योग्य आहार घ्यावा –
– आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर तसेच त्वचेवर होत असतो. जर तूपकट – तेलकट पदार्थ जास्त खाण्यात गेले तसेच चहा कॉफी घेण्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतो आणि चेहऱ्यावर मुरूम व पुळ्या दिसू शकतात.
– आपल्या आहारामध्ये ताजी फळे, भाज्या, कडधान्य तसेच होलग्रेन्स यांचा समावेश करावा.
३. शरीर हायडेटेड ठेवावे –
– आपल्या शरीराला दिवसभरामध्ये किमान आठ ते दहा ग्लास पाणी आवश्यक असते.
– म्हणून आपले शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी शरीरासाठी आवश्यक असेल तितके पाणी पिणे नक्कीच आवश्यक आहे.
– जर आपले शरीर हायट्रेटेड असेल तर नक्कीच त्वचा सुद्धा चांगली राहते.
४. मानसिक ताण कमी घ्यावा –
– ज्या व्यक्तींना जास्त ताणतणाव घेण्याची सवय असते त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर तसेच त्वचेवर सुद्धा जाणवू शकतो म्हणूनच ध्यान किंवा योग करावा यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो आणि मानसिक समाधान लाभून त्वचा आणि शरीर सुद्धा चांगले राहते.
५. नियमित व्यायाम करावा –
व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते तसेच शरीरामध्ये असणारे विषारी द्रव्य किंवा अनावश्यक घटक बाहेर पडतात याचा फायदा आपल्या शरीराला तर होतोच त्यासोबतच त्वचा सुद्धा तजेलदार दिसू लागते.
६. पुरेशी झोप घ्यावी –
– आपल्या शरीरासाठी सात ते आठ तासांची पूर्ण झोप मिळणे खूप आवश्यक आहे.
– जर आपण सात ते आठ तासांची व्यवस्थितरित्या झोप घेतली तर त्याचा फायदा आपल्या शरीरासोबतच आपल्या त्वचेला सुद्धा होतो आणि आपली त्वचा व्यवस्थित राहते.
Read more blogs – हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
त्वचेवरील मुरूम आणि पुळ्या घालवण्यासाठी काही घरगुती उपाय – Some home remedies to get rid of acne and pimples on skin:
१. एलोवेरा जेल : एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरूम कमी होतात व बॅक्टेरियाच्या वाढीला सुद्धा एलोवेरा प्रतिबंध करते.
२. ग्रीन टी फेस मास्क : ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट असतात हे त्वचेला ताजेतवाने करण्यामध्ये मदत करतात तसेच मुरूम आणि पुळ्या कमी करण्यामध्ये मदत करतात. ग्रीन टी बॅग हलक्या गरम पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर चेहऱ्यावर टॅप टॅप करत लावू शकता किंवा इतर फेस पॅक मध्ये थोडासा ग्रीन टी मिसळून लावू शकता.
३. मुलतानी माती मास्क : मुलतानी माती चेहऱ्यावरील तेल कमी करते तसेच त्वचा शुद्ध करण्यासाठी मदत करते. मुलतानी मातीचा लेप तयार करून चेहऱ्यावर लावावा यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करू शकता.
४. बेसन पीठ आणि हळदीचा लेप : बेसन पीठ घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद टाकून दूध किंवा गुलाब पाण्याने मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.
५.संत्र्याच्या सालीची पावडर : संत्र्याची साल काढून त्याची पावडर बनवून ठेवावी. ह्या पावडर मध्ये थोडेसे गुलाब पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावून दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावर ठेवावी त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
वर सांगितल्याप्रमाणे चेहऱ्यावरील मुरूम आणि पुळ्या घालवण्यासाठी विविध उपाय उपलब्ध आहेत परंतु हे उपाय करून प्रत्येक प्रकारच्या मुरूम किंवा पुळ्यांना फरक पडेलच असे नाही म्हणूनच आवश्यक असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. वरील उपायांनी काही साईड इफेक्ट होणार नाहीत परंतु जर शंका असेल तर पॅच टेस्ट करावी म्हणजेच कुठलीही पेस्ट तयार केल्यानंतर हातावर ती पेस्ट लावून थोड्या वेळासाठी ठेवावी जर काही त्रास झाला नाही तर मग चेहऱ्यास लावू शकता.
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा :
काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणामध्ये मुरूम आणि पुळ्या असतात, अशावेळी जर घरगुती उपायांनी किंवा वर सांगितल्याप्रमाणे आहारामध्ये बदल करून तसेच इतर सर्व गोष्टी करून काही फरक पडत नसेल तर नक्कीच त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. डॉक्टर त्वचेवरील मुरूम तसेच पुळ्यांचे प्रमाण,प्रकार लक्षात घेऊन योग्य ते उपाय करतील.
अशाप्रकारे जर चेहऱ्यावरील मुरूम आणि पुळ्या घालवायच्या असेल तर आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक आहे तसेच योग्य तो आहार घेणे, योगा तसेच व्यायाम करणे, पुरेसे पाणी पिणे यांसारखे बदल करून नक्कीच आपली त्वचा निरोगी ठेवू शकतो तसेच शरीर सुद्धा चांगल्या प्रकारे ठेवू शकतो.
If you’re struggling with persistent pimples, blackheads, or other skin issues, despite following home remedies and lifestyle changes, it’s best to consult with experts. Mediskin Hair Clinic is one of the best skin clinics in Kharadi, provides specialized skincare treatments and personalized solutions tailored to your skin’s needs. With professional guidance, you can achieve healthier and clearer skin.