मेलास्मा म्हणजे मराठीत याला वांग येणे असेही म्हणले जाते.आपण सगळे जाणताच की वांग(Melasma) म्हणजे आपल्या चेहऱ्यावर काळसर किंवा तपकिरी रंगाचे डाग येणे. वांग म्हणजेच मेलास्माचे डाग येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे. वांगाच्या एकूण रुग्णांमध्ये जवळजवळ 90 टक्के प्रमाण हे स्त्रियांचे आणि दहा टक्के पुरूषांचे असते. मेलास्मा होण्याची नेमकी कारणं माहित नाही, परंतु अनेक घटक कारणीभूत आहेत.चला तर मग आज आपण बघूया वांग होण्याची कारणे.
वांग होण्याची कारणे-:
वांग होण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये होणारे हार्मोनल बदल जसे की-:
- गर्भावस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये खूप हार्मोन्स मध्ये खूप बदल घडतात त्यामुळे चेहऱ्यावर वांग येऊ शकते.
- प्रसूती नंतरच्या काळातही स्त्रीच्या शरीरात खूप बदल घडतात आणि तेव्हाही हार्मोन्स मध्ये बदलांमुळे तिच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग येऊ शकतात.
- मध्यमवयीन म्हणजे वयाच्या 35 ते 40 वर्षादरम्यान स्त्रियांमध्ये काही हार्मोनल हॉर्मोन्स मध्ये बदल होतात त्या काळातही वांग येण्याचे प्रमाण जास्त असते.
- रजनवृत्तीच्या वेळेस स्त्रीच्या शरीरात सगळ्यात जास्त हार्मोन्स मध्ये बदल होतात, तेव्हा वांगाचे डाग येण्याचे प्रमाण ही खूप जास्त असते.
- तसेच गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास त्यामुळे देखील हार्मोन्समध्ये बदल होऊन चेहऱ्यावर वांगाचे डाग येऊ शकतात.
- तसेच थायरॉईड चा त्रास असल्यास त्यामुळे होणाऱ्या हार्मोन्स मधील बदलांमुळे ही वांगाचे डाग येण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.
हे झाले हार्मोन्स मधील बदलांमुळे चेहऱ्यावर वांगाचे डाग येण्याची कारणे.
वांग होण्याचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ताणतणाव(Stress)-:
मेलास्मा होण्याची एक मुख्य कारण तणाव आहे. तणाव मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे होतो आणि तो मेलास्मा जस्ती समस्यांच्या उत्पत्तीसाठी कारण ठरू शकतो. उदाहरणार्थ, स्त्रीपुरुष जो उदासीन असतात त्यांच्या अंतरंगातील हालचाल ठरवू शकतात आणि त्यामुळे त्यांचा तणाव वाढतो. तणाव वाढल्यास, हार्मोन व्यवस्था विकृत होते आणि एकमेकांवर कार्य करतात, जे मेलास्मा जस्त्या समस्यांच्या उत्पत्तीसाठी उत्तेजना देतात.
️अजूनही काही कारणे आहेत चेहऱ्यावर वांगाचे डाग येण्याची त्याबद्दल जाणून घेऊयात-
आपल्या चेहऱ्याची त्वचा जास्त उष्णतेच्या संपर्कात आल्यास त्यामुळे वांगाचे डाग येण्याची शक्यता असते. आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे ती जर सतत उष्णतेच्या संपर्कात येत असेल तर तिथे रक्षण करण्यासाठी आपले शरीर मेल्यानीन नावाचा संप्रेरक तयार करते, त्याच्या रंग तपकिरी किंवा काळा असतो आणि तेच हे वांगाचे डाग असतात.
- उन्हामध्ये सनस्क्रीन लोशन न लावल्यास सूर्याची अतिनील किरणे आपल्या त्वचेला घातक ठरतात.
- जास्त वेळ टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलची स्क्रीन जवळुन बघितल्यामुळे पण चेहऱ्यावरील त्वचेला हानिकारक किरणांमुळे वांगाचे येऊ शकतात.
- सतत गॅस समोर उभे राहिल्यास त्या उष्णतेमुळेही आपल्या चेहऱ्याचे त्वचा जास्त उष्ण होऊन त्यामुळे अंगाचे डाग येऊ शकतात.
- आपल्या त्वचेला सहन न होणारे क्रीम किंवा कॉस्मेटिक लावल्यामुळे पण वांगाचे डाग येऊ शकतात.
अशा विविध कारणामुळे अंगाचे डाग येऊ शकतात आणि आणि जेवढ्या लवकरात लवकर आपण वांग्याच्या डागावर उपचार करू तेवढ्या लवकर ते बरे होऊ शकतात. पण वांगाच्या डागांवर उपचार हे डॉक्टरांकडे तपासणी करून घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच करावे.
Mediskin Hair Clinic:
डॉ. श्रीदेवी लाखे या खराडी, पुणे येथील सर्वोत्कृष्ट त्वचारोगतज्ज्ञ आहेत. त्यांना त्वचारोग तज्ज्ञ म्हणून 9 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. डॉ. श्रीदेवी लाखे या त्वचारोगतज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, आणि त्वचासौंदर्यविषयक या विषयातही कुशल आहेत.
त्यांनी डीडीव्ही, एमबीबीएस केले आहे. त्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या सदस्या आहेत. डॉ. श्रीदेवी लाखे अनेक वैद्यकीय सेवा देतात ज्यात सल्लामसलत, डर्मारोलर, सन स्पॉट्स, एज स्पॉट्स, इतर पिग्मेंटेड लेझिन्स, केस ट्रीटमेंट, लेझर हेअर रिमूव्हल – फेस, व इतर सेवा समविष्ट आहेत. तुमच्या त्वचेच्या कुठल्याही समस्येसाठी खात्रीशीर उपचार हवे असल्यास डॉ.श्रीदेवी लाखे यांना अवश्य भेटा.