प्रत्येकालाच आयुष्यात सुंदर, तरुण व आकर्षक दिसायचा मोह असतो पण या वातावरणातील बदलामुळे, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे व वाढत चाललेल्या वयामुळे चेहरा निस्तेज होत जातो. मग फक्त चेहऱ्यासाठी महागडी प्रोडक्टचा वापर करतो पण आपल्या शरीराच्या आत मात्र काही बदल होत नाही काही दिवसांनी तेच परत दिसायला लागतो म्हणून शरीराच्या आत शुद्धतेसाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत.
आपल्या शरीर निरोगी व तंदुरुस्त राहावं म्हणून योगा खूप गरजेच आहे. योग केल्याने मानसिक व शारीरिक स्वास्थ वाढतो. वाढत चालेल्या वयानुसार स्कीनचा ग्लो कमी होतो. हार्मोन्सच्या बदलामुळे होणारे आजार पण चेहऱ्यावर दिसू लागतात तेव्हा आपल्याला सौंदर्याची व निरोगी शरीराची काळजी वाटते. आपण घरी बसून योगा करून आपली काळजी योगाद्वारे कशी घेता येईल ते जाणून घेऊया.
योग केल्याने ताणताणाव कमी होतो. पण तुम्हाला माहित आहे का योगासने केल्याने त्वचा चमकदार होते व निरोगी राहण्यास मदत होते.
नैसर्गिकरित्या चेहरा उजळण्यासाठी(Bright Skin) योगासने
योगामुळे चेहरा उजळण्यास(Bright Skin) मदत होते. अकाली सुरकुत्या पडणे प्रामुख्याने ताणतणाव किंवा अस्वस्थ जीवनशैलीमुळे सुरू होऊ शकते. धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थांचे व्यसन हि सुद्धा कारणे असतात. चेहऱ्यावर पुरळ येणे ही आणखी एक सामान्य त्वचेची समस्या आहे. हे कधीकधी शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होऊ शकते आणि अयोग्य पचन देखील मुरुमांच्या रूपात दिसून येते. योगासने तुम्हाला स्वस्थ आणि चमकणारी त्वचा मिळविण्यात मदत करू शकतात. या योगासनांचा सराव केल्याने डोके आणि चेहऱ्याच्या भागात रक्ताभिसरण वाढण्यास मदत होईल, जे नैसर्गिकरित्या सुंदर त्वचेच्या टोनमध्ये मदत करेल. उलटी मुद्रा आपल्या मज्जासंस्थेला उत्तेजित करू शकतात, मेंदूमध्ये अधिक ऑक्सिजन आणि रक्त प्रवाह आणू शकतात, आपला चयापचय दर वाढवू शकतात आणि आपली उर्जा पातळी वाढवू शकतात.
- सूर्यनमस्कार :- सूर्यनमस्कार केल्याने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो व शरीर लवचिक होते चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होतात व स्किन वर स्क्रीन ग्लो करते सूर्यनमस्काराने पूर्ण शरीराला रक्ताचा प्रवाह आणि प्रसार पूर्ण शरीरात होतो.
- फेस योगा:- वाढत्या वयानुसार चेहऱ्यात खूप बदल झाला की एजिंग चेहऱ्यावर दिसतात तर फेस योगामुळे खूप फायदे होतात चेहऱ्याचे स्नायू उत्तेजित होतात. फेस योगा दिवसात दोनदा करू शकता.
- सर्वांगासन :- सर्वांगासनामुळे रक्तप्रवाह पूर्ण शरीरात वाढतो, केस गळणे कमी होते. शरीरातील तणाव कमी होतो. झोप चांगली लागते. वजन कमी होते.
- कपालभाती:- कपालभाती केल्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतो व रक्त शुद्ध होते परिणामी स्किन तरुण व निरोगी दिसते त्वचा सुधारते व ग्लो करते कपालभाती निर्मिती केल्याने मुरूम वर आराम मिळतो.
- भास्त्रिका प्राणायाम:– भस्त्रिका प्राणायाममुळे शरीरात ऑक्सिजन स्थर वाढतो आणि रक्ततात जमा असलेले टॉक्सिन बाहेर पडतात त्यामुळे त्वचा चमकदार बनते रोज दहा-पंधरा मिनिटे मध्ये विराम घेऊन भास्ट्रिका प्राणायाम करायला पाहिजे.
शिशुआसन (बाल मुद्रा) हे आसन डोक्याच्या भागात रक्त परिसंचरण वाढवते आणि तणाव आणि थकवा दूर करते.
योगामुळे नक्कीच सर्व शरीरात उर्जा संचारते आणि बरेच सकरात्मक बदल घडतात. आपली त्वचा नैसर्गिकरीत्या उजळण्यासाठीही मदत होते.
मेडिस्किन हेअर क्लिनिक
डॉ.श्रीदेवी लाखे या खराडी, पुणे येथील सर्वोत्कृष्ट त्वचारोगतज्ज्ञ आहेत. त्यांना त्वचारोग तज्ज्ञ म्हणून 9 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. डॉ. श्रीदेवी लाखे या त्वचारोगतज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, आणि सौंदर्यविषयक विषयातही तज्ञ सल्लागार आहेत. त्यांनी डीडीव्ही, एमबीबीएस केले आहे. त्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या सदस्या आहेत. डॉ. श्रीदेवी लाखे अनेक वैद्यकीय सेवा देतात ज्यात सल्लामसलत, डर्मारोलर, सन स्पॉट्स, एज स्पॉट्स, इतर पिग्मेंटेड लेझिन्स, हेयर ट्रीटमेंट, लेझर हेअर रिमूव्हल आणि बरेच काही समाविष्ट आहे.