Hair care : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या केसांची विशेष काळजी!

मऊ मुलायम, घनदाट काळेभोर केस हे कोणाला नको असतात? कारण  केस हे आपल्या सौंदर्यात विशेष भर घालत असतात. ऋतूमानानुसार व ऋतूबदलामुळे आपल्या केसांवरदेखील विविध परिणाम होत असतात. पावसाळ्यात वातावरण दमट व ओलसर असते. त्यात केस गळणे, दुभंगणे, कोंडा अश्या समस्या निर्माण होऊ लागतात. ते टाळण्यासाठी

खालील उपाय करून आपण आपल्या केसांची विशेष काळजी सहजपणे घेऊ शकतो.
  1. पावसाळ्यात वातावरण गार असल्याने शरीरात पाणी कमी घेतल्या जाते. पण ओलसरपणा एकूणच हवेत असल्याने केसांचे मूळं ( Hair follicles) तो ओलसरपणा शोषून घेतात व फुगीर होतात. त्यातून केस दुभंगणे, दुतोंडी होणे अशी  सुरूवात होते. हे टाळण्यास  नियमितपणे शरीराला आवश्यक 2 ते 3 लिटर पाणी आवश्यक असून याने शरीर ‘हायड्रेटेड’ राहते व  केसांचा दुभंगण्याचा व तुटण्याचा त्रास कमी होतो.
  2. केसांची मुळं पावसाळ्यात नाजूक झालेली असतात तर गळणे, तुटणे हा प्रकार वाढतो, व रोजच्या पेक्षा जास्त प्रमाणात गुंता निघतो आहे असे वाटून केसगळती साठी उपाययोजनांबाबत विचार सुरू होतो.
  3. पावसात भिजल्यावर तसेच ओले केस न ठेवता स्वच्छ  पाण्यातने धुवून कोरडे करावेत. 
  4. छोटी फणी, हेअर ब्रश पावसाळ्यात अतिरिक्त केस ओढून काढतात, म्हणून शक्यतोवर वापरू नये. केस विंचरताना खालून मुळापासून वरपर्यंत करावे. केस कमीत कमी वेळा विंचरावेत. 
  5. केस  मोकळे सोडण्यापेक्षा बांधून ठेवले तर वातावरणाच्या संपर्कात कमी येतात. याने कोंड्याचा त्रास कमी होतो.
  6. केसांना नियमित ऑयलिंग, हेड मसाज करु शकता, याने केस मजबूत राहतील. 
  7. वातावरणातील ओलसरपण केसांना तेलकट बनवते. पण सारखे शॅम्पू करून केस पटकन कोरडे होतात व चमक गमावतात. त्यासाठी  केसांना सतत शॅम्पू करू नये. खूप केस खराब होत असतील  तर तुमच्या केसांना योग्य शाम्पू डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता.
  8. ओले केस बांधू नयेत. शक्यतो हेअर ड्रायर चा वापर करणे टाळावे.
  9. केसांना पोषक असा ई विटामिन युक्त आहार घ्यावा. 

बरेचदा घरगुती उपाय आणि टिप्स वापरून केसांची निगा राखली जाते परंतु जर केसांचा कोरडेपणा, त्यांची चमक कमी आणि केस गळती, खाज वाढली तर तज्ज्ञ डाॅक्टरांशी लगेच संपर्क साधावा. अनेकदा समस्या छोटी असताना उपाय केल्यास पुढे टक्कल किंवा इतर समस्या दूर होण्यास मदत होते 

Mediskin Hair Clinic

डॉ.श्रीदेवी लाखे या खराडी, पुणे येथील सर्वोत्कृष्ट त्वचारोगतज्ज्ञ आहेत. त्यांना  त्वचारोग तज्ज्ञ म्हणून 9 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. डॉ. श्रीदेवी लाखे या त्वचारोगतज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, आणि सौंदर्यविषयक विषयातही तज्ञ सल्लागार आहेत. त्यांनी  डीडीव्ही, एमबीबीएस केले आहे. त्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या सदस्या आहेत. डॉ. श्रीदेवी लाखे अनेक वैद्यकीय सेवा देतात ज्यात सल्लामसलत, डर्मारोलर, सन स्पॉट्स, एज स्पॉट्स, इतर पिग्मेंटेड लेझिन्स, हेयर  ट्रीटमेंट, लेझर हेअर रिमूव्हल आणि बरेच काही समाविष्ट आहे.

 

https://mediskinhairclinic.com/wp-content/uploads/2023/02/Medi-Skin-Hair-Clinic-100h.png
Follow US
86000 09731
mediskinhairclinic01@gmail.com
Address

Medi Skin Hair Clinic | Dermatologist in Kharadi | Hair Transplant Surgeon in Kharadi

Find US

Copyright © 2024 | Mediskin & Hair Clinic| All Rights Reserved